भाड्याच्या घरात राहणाऱ्यांनाही मिळणार सहज पासपोर्ट

भाड्याच्या घरांत राहणाऱ्या नागरिकांना पासपोर्ट बनवण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो, परंतु आता मात्र हे थांबणार आहे. 

Updated: Jun 24, 2015, 11:54 AM IST
भाड्याच्या घरात राहणाऱ्यांनाही मिळणार सहज पासपोर्ट title=

नवी दिल्ली : भाड्याच्या घरांत राहणाऱ्या नागरिकांना पासपोर्ट बनवण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो, परंतु आता मात्र हे थांबणार आहे. 

पासपोर्ट ऑफिसनं पासपोर्ट नियमांमध्ये काही बदल केलेत. त्यामुळे भाड्याच्या घरांत राहणारेही पासपोर्ट बनवू शकणार आहेत. परदेश मंत्रालयाच्या एका आदेशानुसार हा नियम लगेचच लागू करण्यात आलाय. 

भाड्याच्या घराचा करारनामा (रेंट अॅग्रीमेंट) कमीत कमी एक वर्ष जुना असावा, असा नियम अगोदर पासपोर्ट बनवण्यासाठी होता. जर, हा करारनामा एक वर्ष जुना नसेल तर तुम्हाला काही अडचणींना तोंड द्यावं लागत होतं. पण, बदललेल्या नियमांनुसार हा करारनामा नवा असेल तरीही चालू शकेल. परंतु, हा करारनामा रजिस्ट्रारच्या कार्यालयातून बनवण्यात आलेलाच असावा, अशी मात्र अट आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.