नवी दिल्ली : पठाणकोट एअरफोर्स बेसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी अमेरिकेनं भारताला पाकिस्तानविरुद्ध महत्त्वाचे पुरावे दिलेत.
अमेरिकेनं राष्ट्रीय चौकशी समितीला (एनआयए) १००० पानांचं डोजियर (रिपोर्ट) सोपवलंय. यामध्ये दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचा हँडलर काशिफ जान आणि चार फिदायीन दहशतवाद्यांमध्ये झालेल्या संभाषणाचा रेकॉर्ड आहे.
या वर्षांच्या सुरुवातीला जानेवारी महिन्यात पठाणकोट एअरबेसवर झालेल्या हल्ल्यात ७ जवान शहीद झाले होते. या डोजियरमध्ये पाकिस्तानच्या नापाक डावपेचांचा खुलासा झालाय.
या हल्ल्यादरम्यान पाकिस्तानमध्ये हँडलरच्या संपर्कात होते. हँडलरशी सलग ८० तासांहून जास्त वेळ संपर्कात होते.
एका रिपोर्टनुसार, हल्यादरम्यान चार फिदायीन नासिर हुसैन, अबू बकर, उमर फारुक आणि अब्दुल कयूम ८० तासांपर्यंत पाकमध्ये बसलेल्या आपल्या हँडलर्सच्या संपर्कात होते.
व्हॉटसअपवर बोलण्याव्यतिरिक्त कासिम जान एक फेसबुक अकाऊंटही चालवत होता. हे अकाऊंट त्याच नंबरशी जोडलं गेलंय ज्यावरून हल्लेखोरांनी एसपी सलविंदर सिंह यांना किडनॅप करताना पठाणकोटहून कॉल केला होता.
फेसबुक अकाऊंटशी निगडीत नंबरवरही दहशतवाद्यांनी पाकिस्तानात कॉल केला होता. हे अकाऊंट कासिम जानच चालवत होता. हे अकाऊंट पाकिस्तानस्थित टेलिकॉम फर्म्सच्या आयपी अॅड्रेसचा वापर करून एक्सेस केलं गेलं.
दहशतवाद्यांनी जैश - ए- मोहम्मदची फायनान्शिअल बॉडी अल-रहमत-ट्रस्टच्या नंबरवरदेखील कॉल केला होता.
याबद्दल भारतानं अमेरिकेकडून टेक्निकल डिटेल्स मागितले होते. एनआयएनं अमेरिकेकडे चॅटस् आणि अकाऊंट डिटेल्स मागितले होते.
पठाणकोटमध्ये एअरफोर्स बेसवर दहशतवादी हल्लाचा मास्टरमाईंड मसूद अजहर होता जो जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख आहे.