पाकिस्तानविरुद्ध संसदेत निषेधाचा ठराव

पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीमध्ये भारताविरुद्ध ठराव मांडल्यानंतर पाकिस्तानविरुद्ध संसदेत आज निषेधाचा ठराव मांडण्यात आला. लोकसभेत अध्यक्ष तर राज्यसभेत सभापतींना हा ठराव मांडला.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Aug 14, 2013, 03:23 PM IST

www.24taas.com , झी मीडिया, नवी दिल्ली
पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीमध्ये भारताविरुद्ध ठराव मांडल्यानंतर पाकिस्तानविरुद्ध संसदेत आज निषेधाचा ठराव मांडण्यात आला. लोकसभेत अध्यक्ष तर राज्यसभेत सभापतींना हा ठराव मांडला.
संसदेच्या कामकाजाचा दुसरा आठवडाही वाया जाण्याच्या बेतात आहे. उद्या स्वातंत्र्यदिनाच्या सुटी आहे. त्यामुळे या आठवड्यातला केवळ शुक्रवारचा दिवस शिल्लक आहे. मात्र विविध मुद्द्यांवरून गदारोळ होत असल्यामुळे संसदेचं कामकाजच होऊ शकलेलं नाही.

विरोधक आणि सरकारमध्ये सामंजस्य होण्याची चिन्हंही नाहीत. काल कमलनाथ यांनी घेतलेल्या सर्वपक्षीय बैठकीतही काही तोडगा निघू शकलेला नाही. अशा स्थितीत UPA सरकारचं स्वप्न असलेलं अन्न सुरक्षा विधेयकासह अनेक महत्त्वाची विधेयकं रखडण्याचीच चिन्हं आहेत. मात्र, ते पारित व्हावं म्हणून काँग्रेसने व्हीप बजावला आहे.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.