चिमुरडीच्या मृत्यूचं दु:ख; पीडित कुटुंबाला हेमामालिनी यांची मदत

अभिनेत्री आणि भाजप खासदार हेमा मालिनी यांनी आपल्या गाडीसोबत झालेल्या अपघातात जखमी झालेल्या पीडितांना आर्थिक मदत देऊ केलीय. 

Updated: Jul 4, 2015, 08:45 PM IST
चिमुरडीच्या मृत्यूचं दु:ख; पीडित कुटुंबाला हेमामालिनी यांची मदत title=

मुंबई : अभिनेत्री आणि भाजप खासदार हेमा मालिनी यांनी आपल्या गाडीसोबत झालेल्या अपघातात जखमी झालेल्या पीडितांना आर्थिक मदत देऊ केलीय. 

हेमा मालिनी यांची मुलगी ईशानं हा खुलासा केलाय. माझ्या आईनं पीडित कुटुंबाला मदत करण्याचा निर्णय घेतलाय. ती एक नेता आहे म्हणून ती ही मदत करणार नाही तर ती एक चांगली व्यक्तीही आहे, असं ईशानं यावेळी म्हटलंय. 

गुरुवारी राजस्थानच्या दौसा जिल्ह्यात झालेल्या कार अपघातात हेमा मालिनी गंभीर जखमी झाल्या तर दुसऱ्या गाडीत असलेल्या एका चार वर्षीय सोनम या चिमुरडीचा जीवही या अपघातानं घेतला. तर सोमचे वडील हनुमान महाजन, त्यांची पत्नी शिखा (३५), सोमिल आणि सीमा हे चौघे जण जखमी झाले. 

यानंतर आज मुंबईत परतलेल्या हेमा मालिनी यांनी अपघातातील चिमुरडीच्या मृत्यूवर दु:ख व्यक्त केलंय. ही खुपच दु:खद घटना आहे. मुलीच्या निधनानंतर तिचे कुटुंबीय किती कठिण परिस्थितीतून जात आहे हे मी समजू शकते. मी ईश्वरचरणी प्रार्थना करते की या कुटुंबाला या कठिण परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी बळ मिळो, असं जखमी हेमा मालिनी यांनी म्हटलंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.