'पीएफ'साठी आता एकच क्रमांक

केंद्र शासनाने  भविष्य निर्वाह निधी, अर्थात प्रोव्हिडन्ट फंडसाठी युनिव्हर्सल अकाऊंट नंबर सुरू केला आहे. 

Updated: May 17, 2015, 01:52 PM IST
'पीएफ'साठी आता एकच क्रमांक title=

मुंबई : केंद्र शासनाने  भविष्य निर्वाह निधी, अर्थात प्रोव्हिडन्ट फंडसाठी युनिव्हर्सल अकाऊंट नंबर सुरू केला आहे. 

या क्रमांकामुळे कामगारांनी कंपनी बदलली, तरी त्यांचा पीएफ एकाच क्रमांकावर जमा होणार आहे. याबाबत सर्वांना माहित व्हायला हवं, म्हणून शासनाने देशभर 'पीएफ आपके द्वार' या अभियानाची सुरूवात सुरूवात केलीय.

याविषयी बोलतांना अतिरिक्त केंद्रीय भविष्य निर्वाह निधी आयुक्त के. एल. गोयल म्हणाले, शासनाच्या अभियानाच्या माध्यमातून यूएएन क्रमांक कसा सुरू करायचा? त्याचे फायदे काय? याबाबत जनजानगृती सुरू आहे. 

कामगार आणि आस्थापनांत जनजागृती करण्यासाठी कामगार संघटना आणि आस्थापना व्यवस्थापन प्रतिनिधींना एकत्रित घेऊन माहिती देण्याचा प्रयत्न शासन करत आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.