जिओच्या ग्राहकांसाठी एक गूडन्यूज आणि एक बॅडन्यूज

रिलायन्स जिओने नुकताच समर सरप्राइज ऑफर मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ज्यांनी या आधी नोंद केली आहे त्यांनाच या ऑफरचा लाभ घेता येणार आहे. कंपनीने प्रेस रिलीज जारी करुन याबाबत माहिती दिली आहे. कंपनीने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवरुन जिओ प्राईमसाठी रजिस्ट्रेशनचं ऑप्शन देखील हटवलं आहे.

Updated: Apr 10, 2017, 04:16 PM IST
जिओच्या ग्राहकांसाठी एक गूडन्यूज आणि एक बॅडन्यूज title=

मुंबई : रिलायन्स जिओने नुकताच समर सरप्राइज ऑफर मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ज्यांनी या आधी नोंद केली आहे त्यांनाच या ऑफरचा लाभ घेता येणार आहे. कंपनीने प्रेस रिलीज जारी करुन याबाबत माहिती दिली आहे. कंपनीने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवरुन जिओ प्राईमसाठी रजिस्ट्रेशनचं ऑप्शन देखील हटवलं आहे.

जिओ प्राईमसाठी आता वेबसाईटवरुन तुम्हाला रजिस्ट्रेशन करता नाही येणार आहे. समर सरप्राईजबाबतचा कोणताही उल्लेख आता तेथे दिसत नाही आहे. पण कंपनी लवकरच नवा प्लान लॉन्च करणार आहे. जिओच्या वेबसाईटवर लिहिलं आहे की, 'आम्ही आमच्या टेरिफ प्लान अपडेट करत आहोत आणि लवकरच आम्ही नवे आकर्षक प्लान सुरु करणार आहोत.'