अब्दुल्लांनी मागितली सनाउल्लाहच्या कुटुंबीयांची माफी

जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी मृत पाकिस्तानी कैदी सनाउल्लाह रंजय याच्या कुटुंबीयांची माफी मागितलीय. चंदीगडच्या एका हॉस्पीटलमध्ये सनाउल्लाहनं आज अखेरचा श्वास घेतला.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: May 9, 2013, 03:52 PM IST

www.24taas.com, श्रीनगर
जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी मृत पाकिस्तानी कैदी सनाउल्लाह रंजय याच्या कुटुंबीयांची माफी मागितलीय. चंदीगडच्या एका हॉस्पीटलमध्ये सनाउल्लाहनं आज अखेरचा श्वास घेतला.
ओमर यांनी मायक्रो ब्लॉगिंग साईट ट्विटरवर लिहिलंय, ‘मी लिहिलेले सांत्वनेचे शब्द क्षुल्लक असतील पण मी सनाउल्लाह याच्या कुटुंबीयांची मनापासून माफी मागू इच्छितो. त्यांच्या कधीही न भरून येणाऱ्या नुकसानाबद्दल मला जाण आहे.`

जम्मूच्या कोट भलावल जेलमध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या ५२ वर्षीय सनाउल्लाह याच्यावर गेल्या शुक्रवारी काही कैद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात सनाउल्लाह गंभीर जखमी झाला होता. त्याचा आज सकाळी चंदीगडच्या पीजीआयएमईआर हॉस्पीटलमध्ये मृत्यू झाला. राज्य सरकारनं या घटनेच्या चौकशीचे आदेश दिलेत. ‘या चौकशीत कोणत्याही प्रकारचा लापरवाहीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर त्याची जबाबदारी सोपवली गेलीय. परंतू जे काही घडलंय ते वाईटच आहे’. सोबतच सनाउल्लाहला वाचवण्याचा अटोकाट प्रयत्न करणाऱ्या जम्मूच्या सरकारी मेडिकल कॉलेज आणि चंदीगडच्या हॉस्पीटलमधील डॉक्टरांचं कौतुक केलंय.