नई दिल्ली : येणाऱ्या काही दिवसांत एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय... पण, पेट्रोलियम मंत्र्यांनी मात्र दरवाढ होणार असल्याच्या वृत्ताला धुडकावून लावलंय.
पेट्रोलियम मंत्रालय विशेषज्ञ समितीच्या सिफारशींनुसार रॉकेल आणि घरगुती गॅसच्या किंमतीमध्ये वाढ करण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळ ‘सीसीपीए’कडे हा प्रस्ताव पाठवणार असल्याची माहिती मिळतेय. पेट्रोलियम मंत्रालयानं हिरवा कंदील दाखवला तर एलपीजी प्रत्ये सिलेंडरमागे जवळपास 250 रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे. पेट्रोलियम मंत्रालयानं गॅस सिलेंडरवर 250 रुपये दरवाढीचा प्रस्ताव दिलाय.
दुसरीकडे, गॅस आणि केरेसिनच्या दरवाढीचा कुठलाही प्रस्ताव नसल्याची माहिती पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ‘झी मीडिया’शी बोलताना दिलीय. त्यांनी डिझेल, रॉकेल आणि एलपीजीच्या दरांत वाढ होणार नसल्याचं सांगितलंय.
पेट्रोलीयम मंत्रालयाच्या किरिट पारेख समितीनं केंद्राकडे पाठवलेल्या प्रस्तावानूसार रॉकेलची किंमतही लिटर मागे 5 ते 6 रुपयांनी तर एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत 250 रुपयांची वाढ करण्याचा प्रस्ताव केंद्राकडे मांडण्यात आलाय. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दरमहा 50 पैशांनी वाढ करण्याचा प्रस्ताव पेट्रोलीयम मंत्रालयानं केंद्र सरकारकडे केलाय. जर हा प्रस्ताव मंजूर झाला तर जनतेला पुन्हा महागाईचे चटके खावे लागणार आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.