मॅगीनंतर आता व्हिस्की, बिअर FSSAI च्या रडारवर

मॅगीमध्ये प्रमाणापेक्षा जास्त अजिनोमोटो सापडल्यानंतर देशात अनेक राज्यांमध्ये मॅगीवर बंदी घालण्यात आली. आता FSSAIच्या (भारतीय अन्न सुरक्षा मानदंड प्राधिकरण) रडारवर व्हिस्की, बिअर आली आहे. याची तपासणी करण्यात येणार आहे.

Updated: Jun 25, 2015, 04:49 PM IST
मॅगीनंतर आता व्हिस्की, बिअर FSSAI च्या रडारवर title=

नवी दिल्ली : मॅगीमध्ये प्रमाणापेक्षा जास्त अजिनोमोटो सापडल्यानंतर देशात अनेक राज्यांमध्ये मॅगीवर बंदी घालण्यात आली. आता FSSAIच्या (भारतीय अन्न सुरक्षा मानदंड प्राधिकरण) रडारवर व्हिस्की, बिअर आली आहे. याची तपासणी करण्यात येणार आहे.

मॅगी, न्यूडल्सवर घातलेल्या बंदीनंतर आता बिअर आणि व्हिस्कीची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती FSSAIच्या एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले. दारु आणि दारुयुक्त पेयांसाठी प्रमाण ठरवण्याचे काम सुरु आहे. येत्या दोन महिन्यांमध्ये FSSAIयासाठी एक मसूदा तयार करेल, ज्याच्यावर लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्या जातील. यामुळे व्हिस्की, व्होडका, जिन, बिअर तसेच ब्रीजर या सर्व पेयांसाठी ठराविक प्रमाण प्रस्तावित केले जाईल, असे ते म्हणालेत.

या वर्षाच्या सुरुवातीलाच केंद्रातील सल्लागार समितीने दारु आणि दारुयुक्त पेयांसाठी योग्य प्रमाण ठरविण्यासंबंधात चर्चा केली होती. तेव्हा असा ठराव झालाय. दारु आणि दारुजन्य पदार्थांसाठी प्रमाण ठरविण्याचा अंतिम निर्णय घेतला जाईल. व त्यानंतर त्याबद्दलची सूचना सर्व राज्य तसेच केंद्रशासित राज्यांना कळविण्यात येईल, असे या अधिकाऱ्यांने सांगितले. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.