रेल्वेने प्रवास करताय?? मग हे वाचाच

रेल्वे प्रवासादरम्यान जर एसी खराब झाल्यास प्रवासी यापुढे प्रवासभाडं परत मिळणार आहे. जेवढ्या अंतरापर्यंत एसी बंद राहील तेवढ्या अंतराचे भाडं परत मिळणार आहे. यासाठी प्रवाश्यांना कोच कंडक्टरकडून एसी खराब असल्याचे सर्टिफीकेट घेणे आवश्यक आहे. प्रवासादरम्यान या सर्टिफीकेटची मागणी प्रवाश्यांना करावी लागेल. कोच कंडक्टर ट्रेनमधील कोच अटेंडन्टकडून हे सर्टिफीकेट जारी करेल. या सर्टिफीकेटच्या मदतीने तुम्ही प्रवासभाडं परत मिळवू शकाल. 

Updated: Jun 25, 2015, 04:47 PM IST
रेल्वेने प्रवास करताय?? मग हे वाचाच title=

मुंबई : रेल्वे प्रवासादरम्यान जर एसी खराब झाल्यास प्रवासी यापुढे प्रवासभाडं परत मिळणार आहे. जेवढ्या अंतरापर्यंत एसी बंद राहील तेवढ्या अंतराचे भाडं परत मिळणार आहे. यासाठी प्रवाश्यांना कोच कंडक्टरकडून एसी खराब असल्याचे सर्टिफीकेट घेणे आवश्यक आहे. प्रवासादरम्यान या सर्टिफीकेटची मागणी प्रवाश्यांना करावी लागेल. कोच कंडक्टर ट्रेनमधील कोच अटेंडन्टकडून हे सर्टिफीकेट जारी करेल. या सर्टिफीकेटच्या मदतीने तुम्ही प्रवासभाडं परत मिळवू शकाल. 

रेल्वेनं आपल्या प्रवाश्यांना अनेक सुविधा दिल्या आहेत ज्या सर्वसामान्यांना माहित नसतात. नुकतीच ट्रेनमध्ये एसी खराब असल्याची तक्रार आली आहे. मंगळवारी सत्याग्रह एक्स्प्रेसचा एसी जवळपास साडेसहा तास बंद असल्यामुळे प्रवाश्यांचे हाल झाले. तीन दिवसांपूर्वी अवध-आसाम आणि लखनऊ- इंटरसिटीमध्येही एसी खराब झाल्याची तक्रार प्रवाश्यांनी केली होती. परंतु पुरेशा माहितीअभावी कुणालाही रिफंड मिळाला नाही. 

एसी बंद पडल्यास कोच कंडक्टरकडून सर्टिफीकेट घेऊन जवळच्या आरक्षण केंद्रातून रक्कम परत घेता येऊ शकेल. ई-तिकीट असल्यास त्यासाठी ऑनलाईन टीडीआर भरावा लागणार आहे. त्यामुळे ज्या बँक खात्यातून रक्कम गेली असेल त्या खात्यात पुन्हा जमा करण्यात येईल. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.