अहमदाबाद : प्रसिद्ध नृत्यांगना मृणालिनी साराभाई यांचं अहमदाबादमध्ये निधन झालंय. त्या ९७ वर्षांच्या होत्या.
कथ्थक आणि भरतनाट्यम या शास्त्रीय नृत्यांमध्ये त्यांनी गुरूस्थान पटकावलं होतं. देशविदेशातले तब्बल १८ हजार विद्यार्थी त्यांच्या हाताखालून गेले आहेत. सुमारे ३०० नृत्यनाट्यांचं दिग्दर्शन त्यांनी केलंय.
नृत्याबरोबरच साहित्य क्षेत्रातही त्यांनी मुशाफिरी केली. कादंबऱ्या, कविता, नाट्यलेखन, बालसाहित्य असं विपुल साहित्य मृणालिनी यांनी निर्माण केलं. गुजरात राज्य हस्तकला आणि हातमाग विकास मंडळाच्या त्या अध्यक्षा राहिल्या आहेत.