सामूहिक बलात्कार करणाऱ्या नराधमांना केवळ जोडे मारण्याची शिक्षा

उत्तर प्रदेशमधील एका जात पंचायतच्या आदेशनानंतर सामूहिक बलात्कारासारख्या गंभीर गुन्हा करणाऱ्यांना केवळ पाच -पाच जोडे मारण्याची शिक्षा देऊन सोडण्यात आले. 

Updated: Jan 21, 2016, 01:44 PM IST
सामूहिक बलात्कार करणाऱ्या नराधमांना केवळ जोडे मारण्याची शिक्षा title=

बागपत (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशमधील एका जात पंचायतच्या आदेशनानंतर सामूहिक बलात्कारासारख्या गंभीर गुन्हा करणाऱ्यांना केवळ पाच -पाच जोडे मारण्याची शिक्षा देऊन सोडण्यात आले. 

पिडीतांच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार,  गावातील काही जणांनी बदनामीच्या भितीने त्यांना पोलिसांत तक्रार करायलाही दिली नाही. गाव पंचायतीसमोर हे प्रकरण आल्यानंतर पंचायतीने सर्वांसमक्ष या आरोपींना माफी मागायला लावली आणि पाच जोडे हाणून त्यांना सोडून दिले. 

मंगळवारी ही घटना घडली होती. पिडीता मंगळवारी सकाळी आपल्या मैत्रिणीसह कॉलेजला जात होती. यावेळी रस्त्यात एका टँकर चालकाने या दोघींन लिफ्ट दिली. त्यावेळी आणखी दोन युवक तेथे उपस्थित होते. 

कॉलेजजवळ पोहोचल्यावर पिडीताच्या मैत्रिणीला तेथे सोडण्यात आले. मात्र पिडीताला घेऊन हे तिनही आरोपी अज्ञातस्थळी गेले आणि त्यांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.