विनाअनुदानित सिलेंडर 21 रुपयांनी महाग

१ जूनपासून सर्व्हिस टॅक्सबरोबर आता तेल कंपन्यांकडून विनाअनुदानित गॅस सिलिंडरच्या दरात देखील वाढ केलीये. तब्बल 21 रुपयांनी विनाअनुदानित  सिलेंडरची किंमत वाढलीये. नवी दिल्लीत आता या विनाअनुदानित सिलेंडरची किंमत ५४८.५० रूपये ईतकी झाली आहे. शिवाय, जेट इंधनाच्या किंमतीतदेखील 9.2 टक्क्यांनी वाढल्या आहेत.

Updated: Jun 1, 2016, 03:13 PM IST
विनाअनुदानित सिलेंडर 21 रुपयांनी महाग  title=

नवी दिल्ली : १ जूनपासून सर्व्हिस टॅक्सबरोबर आता तेल कंपन्यांकडून विनाअनुदानित गॅस सिलिंडरच्या दरात देखील वाढ केलीये. तब्बल 21 रुपयांनी विनाअनुदानित  सिलेंडरची किंमत वाढलीये. नवी दिल्लीत आता या विनाअनुदानित सिलेंडरची किंमत ५४८.५० रूपये ईतकी झाली आहे. शिवाय, जेट इंधनाच्या किंमतीतदेखील 9.2 टक्क्यांनी वाढल्या आहेत.

किती होणार खिसा खाली ?

पेट्रोलच्या दरात मंगळवारी मध्यरात्रीपासून लिटरमागे 2.58 रुपये; तर डिझेलच्या दरात 2.26 रुपये वाढ करण्यात आली. यानुसार दिल्लीत पेट्रोलचा दर 65.60 रुपये प्रतिलिटर तर डिझेलचा दर 53.93 रुपये प्रतिलिटर असेल, असे इंडियन ऑइल कॉर्पोरेशनकडून (आयओसी) जाहीर करण्यात आले आहे.