नवी दिल्ली : रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रेल्वे प्रवाशांना एक खूशखबर दिली आहे. रेल्वेमधून जर तुम्ही विनातिकिट प्रवास करत आहात तर आता तुम्हाला त्यासाठी दंड भरावा नाही लागणार.
चलत्या ट्रेनमध्येच आता तिकीटाची सुविधा रेल्वेने सुरु केली आहे. जर तुम्ही विनातिकीट ट्रेनमध्ये चढलात तर तुम्हाला दंड भरण्याची गरज नाही. तुम्हाला टीसीकडून तिकीट घ्याव लागेल.
सुपरफास्ट रेल्वेमध्ये टीसींना तिकिट मशीन देण्यात आलं आहे. आता टीसीकडूनच तुम्हाला तिकीट मिळणार आहे. सुरुवातीला लखनऊ मेल, गरीब रथ, अर्चना सुपरफास्ट, राजधानी सुपरफास्ट या रेल्वेमध्ये टीसींना हँड-हेल्ड मशीन देण्यात आली आहे. ज्यामाध्यमातून ते तुम्हाला तिकीट देणार आहे.
विना तिकीट जर तुम्ही ट्रेनमध्ये चढलात तर तुम्हाला टीसींना संपर्क करुन तिकीट घ्यावं लागेल. ऐवढंच नाही तर ट्रेनमध्ये जी सीट खाली होईल लगेचच वेटींग तिकीट वाल्यांना सीट दिली जाईल.
या नव्या मशीनमध्ये प्रत्येक कोचमधील रिकामी सीट आणि कोणत्या स्थानकावर कोणता प्रवासी उतरणार आहे याची माहिती मिळेल.