'पंचायत 3' नंतर 'विधायकजीं'च्या मुलीला नेटकरी विचारतायत 'असे' प्रश्न

Panchayat 3 : 'पंचायत 3' मधील 'विधायकजीं'च्या मुलीला नेटकरी करतायत हे प्रश्न...

दिक्षा पाटील | Updated: Jun 17, 2024, 12:12 PM IST
'पंचायत 3' नंतर 'विधायकजीं'च्या मुलीला नेटकरी विचारतायत 'असे' प्रश्न title=
(Photo Credit : Social Media)

Panchayat 3 : 28 मे रोजी ‘पंचायत’ या सीरिजचा तिसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सीझनला देखील प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. प्रदर्शनानंतर सोशल मीडियावर काही क्लिप व्हायरल झाल्या आहेत. लोकांनी त्यावर अनेक मीम्स बनवले आणि त्यातील क्लिप्स या सोशल मीडियावर शेअर करत त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. याच सीझनमध्ये आमदाराच्या मुलीच्या भूमिकेत दिसलेल्या किरणदीप कौरची देखील चर्चा सुरु आहे. हा सीझन प्रदर्शित झाल्यानंतर तिच्या आयुष्यात कसे बदल झाले त्याविषयी तिनं सांगितलं आहे. 

खरंतर, ‘पंचायत 3’ च्या निर्मात्यांनी या सीझनमध्ये अनेक नवीन भूमिका प्रेक्षकांच्या भेटीला आणल्या. त्यापैकी एक म्हणजे आमदाराची मुलगी. तर किरणदीप कौरनं आमदाराच्या मुलीची भूमिका साकारली होती. तर तिच्या या भूमिकेचं नाव चित्रा असं होतं. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिला किती प्रपोजल आले याविषयी विचारण्यात आलं. किरणदीपनं ही मुलाखत एन्टरटेनमेंट लाइव्हला दिलेली होती. त्यावेळी किरणदीपनं सांगितलं की प्रपोजला नाही थेट लग्नासाठी विचारण्यात आलं. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

किरणदीप कौरनं सांगितलं की सोशल मीडियावर लोक तिला बोलताना दिसत आहेत की आमदारांकडे तुमच्या लग्नाची मागणी घालू का, राग तर येणार नाही ना. त्याशिवाय मेसेज करुन विचारलं की खरंच तुझ्या वडिलांनी श्वानाला मारून खाल्लं होतं का? तर अनेकांनी मेसेज करुन हा सल्ला ही दिला की सगळीकडून त्याला खूप जास्त प्रेम मिळत आहे. 

आता तुम्हाला याचा संदर्भ लागत नसेल तर त्यात दाखवण्यात आलं आहे की आमदारावर श्वानाला मारून खाण्याचा आरोप करण्यात आला आहे आमि त्यामुळे त्यांची आमदारकी ही जाते. तर आमदाराची भूमिका ही पंकज झा यांनी साकारली आहे. सीरिजमध्ये किरणदीपची भूमिका खूप छोटी होती. पण अशी आशा दर्शवली जाते की सीझनमध्ये तिची भूमिका देखील महत्त्वाची दिसू शकते. 

हेही वाचा : ना बॉलिवूड थांबवू शकलं ना साऊथ; 10 दिवसात शर्वरी वाघच्या 'मुंज्या'नं Box Office वर केली कमाल

'पंचायत' या सीरिजनं सगळ्यांची मने जिंकली. या सीरिजनं पहिल्या सीझनपासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. आता या सीरिजच्या चौथ्या भागाची प्रतिक्षा करत आहेत. या सीरिजच्या तिसऱ्या भागाचा शेवट पाहता आता पुढे काय होणार हे जाणून घेण्यासाठी सगळे उत्सुक आहेत.