सोनाक्षी सिन्हाच्या होणाऱ्या सासू-सासऱ्यांना पाहिलं? Father's Day च्या दिवशी झहीरच्या कुटुंबासोबत दिसली अभिनेत्री

Sonakshi Sinha with Zaheer Iqbal's Family : सोनाक्षी सिन्हा 'फादर्स डे' च्या निमित्तानं वडील शत्रुघ्न सिन्हा यांच्यासोबत नाही तर झहीर इक्बालच्या कुटुंबासोबत होती.

दिक्षा पाटील | Updated: Jun 17, 2024, 12:52 PM IST
सोनाक्षी सिन्हाच्या होणाऱ्या सासू-सासऱ्यांना पाहिलं? Father's Day च्या दिवशी झहीरच्या कुटुंबासोबत दिसली अभिनेत्री title=
(Photo Credit : Social Media)

Sonakshi Sinha with Zaheer Iqbal's Family : गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल त्यांच्या लग्नाची चर्चा सुरु आहे. कथितपणे हे दोघं 23 जून रोजी त्यांच्या जवळच्या मित्रांच्या आणि कुटुंबाच्या उपस्थित लग्न बंधनात अडकणार आहेत. या सगळ्यात आता चर्चा एका वेगळ्याच गोष्टीची आहे. जिथे एकीकडे काल 16 जून रोजी संपूर्ण देशानं फादर्स डे साजरा केला. तर दुसरीकडे सोनाक्षी ही झहीर इक्बालच्या कुटुंबासोबत दिसली. त्यांचे फॅमिली फोटो आता समोर आले आहेत. ज्यात सोनाक्षी ही तिच्या होणाऱ्या सासू-सासऱ्यांसोबत दिसत आहे. 

16 जून रोजी झहीर इक्बालची बहीण सनम रतनसीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून तिच्या वडिलांसोबतचा एक मोनोक्रोमॅटिक फोटो शेअर केला. त्यासोबत त्यांना फादर्स डेच्या शुभेच्छा दिल्या. दुसऱ्या फोटोत त्यांच्या घरची होणारी सून म्हणजेच सोनाक्षी सिन्हा त्या कुटुंबासोबत दिसली. फोटोत सोनाक्षीनं को-ऑर्ड परिधान केला आहे. तर सनमनं पांढऱ्या रंगाची ट्रॅक पॅन्ट परिधान केली. यावेळी संपूर्ण इक्बाल कुटुंब हे होणाऱ्या सुनेसोबत पोज देताना दिसले. 

first photo of Zaheer Iqbal s family Sonakshi Sinha spend Father s Day with them

फोटो शेअर केल्याच्या काही मिनिटात हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. सनम रत्नसी एक सेलिब्रिटी स्टायलिस्ट आहे. तिनं संजय लीला भन्साळींच्या 'हीरामंडी' मध्ये सगळ्यात जास्त कलाकारांना स्टाइल केलं आहे. त्यामुळे पहिल्यांदा सोनमचा झहीरच्या संपूर्ण कुटुंबासोबतचा फोटो पाहायला मिळाला आहे. 

हेही वाचा : 'पंचायत 3' नंतर 'विधायकजीं'च्या मुलीला नेटकरी विचारतायत 'असे' प्रश्न

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर सोनाक्षी आणि झहीरच्या लग्नाची पत्रिका समोर आली होती. व्हायरल झालेल्या या पत्रिकेतून एक गोष्ट लक्षात आली की त्यांचं लग्न हे मुंबईत शिल्पा शेट्टीच्या रेस्टॉरंट बास्टियनमध्ये होणार आहे. संध्याकाळी हा कार्यक्रम होणार असून त्यासाठी ड्रेस कोड हा फॉर्मल ठेवण्यात आला आहे. त्याशिवाय येणाऱ्या पाहुण्यांना लाल रंगाचे कपडे परिधान न करण्याची सुचना देण्यात आली आहे. दरम्यान, 'न्यूज 18' च्या एका रिपोर्टनुसार, त्यांच्या या खास दिवशी आयुष शर्मा, हुमा कुरेशी आणि वरुण शर्मा सारखे कलाकार उपस्थित असणार आहेत. तर त्यांच्या लग्नाची पत्रिका ही सध्या संजय लीला भन्साळी, फरदीन खान, ताहा शाह बदुशा, अदिति राव हैदरी, शर्मिन सहगल मेहता यांना पाठवण्यात आल्याचे म्हटले जाते.