नवी दिल्ली : एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. कारण रेल्वे प्रशासनाने काही नियंमामध्ये बदल केले आहेत. आता सामान्य बोगीतून म्हणजेच जनरल डब्यातून प्रवास करणाऱ्यां प्रवाशांनी जनरल डब्याचं तिकीट खरेदी केलं असेल तर त्या तिकीटावर तुम्ही फक्त २०० किलोमीटर पर्यंतच प्रवास करू शकता.
जनरल डब्याच्या तिकीटावर आता तुम्हाला ३ तासात प्रवास करणं बंधनकारक असणार आहे. तुम्ही ज्या रेल्वेचं तिकीट खरेदी केलं आहे त्या रेल्वेच्या वेळेनुसार पुढील ३ तास हे तिकीट वैध राहणार आहे. त्यानंतर जर तुम्ही त्या तिकीटावर प्रवास करत असाल तर तुमच्याकडून दंड आकारण्यात येणार आहे. अशी माहिती रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी संसदेत दिली आहे.
नव्या नियमानुसार १९९ किलोमीटर पर्यंतचं जनरल तिकीटाचे पैसे रिफंड नाही केले जाणार तर २०० किलोमीटरच्या पुढच्या तिकीटासाठी जुनेच नियम लागू असणार आहेत.