'नेत्र' एअरबोन अर्ली वॉर्निंग अँड कंट्रोल सिस्टीम हवाई दलात दाखल

पहिली संपूर्ण भारतीय बनावटीची एअरबोन अर्ली वॉर्निंग अँड कंट्रोल सिस्टिम आज हवाई दलात दाखल झाली. 'नेत्र' नावाची ही प्रणाली DRDOच्या सेंटर फॉर एअरबोन सिस्टिम्स या विभागानं तयार केली आहे. विशेष म्हणजे या विभागाच्या प्रमुख जे. मंजुला या महिला वैज्ञानिक आहेत आणि त्यांची टीमही महिलांचीच आहे.

Updated: Feb 14, 2017, 11:00 PM IST
'नेत्र' एअरबोन अर्ली वॉर्निंग अँड कंट्रोल सिस्टीम हवाई दलात दाखल title=

मुंबई : पहिली संपूर्ण भारतीय बनावटीची एअरबोन अर्ली वॉर्निंग अँड कंट्रोल सिस्टिम आज हवाई दलात दाखल झाली. 'नेत्र' नावाची ही प्रणाली DRDOच्या सेंटर फॉर एअरबोन सिस्टिम्स या विभागानं तयार केली आहे. विशेष म्हणजे या विभागाच्या प्रमुख जे. मंजुला या महिला वैज्ञानिक आहेत आणि त्यांची टीमही महिलांचीच आहे.

तब्बल 10 वर्षांच्या अथक संशोधनातून या महिला संशोधकांनी 'नेत्र' ही अद्ययावत प्रणाली तयार केली आहे. विमानावर बसवलेल्या या प्रणालीमुळे 200 किलोमीटर टप्प्यातली जमीन, हवा किंवा समुद्रामधली क्षेपणास्त्र-जेटचा छडा लावला जाऊ शकतो.