जनता, कामायनी रेल्वे अपघात : रेल्वे हेल्पलाईन क्रमांक

मध्यप्रदेशच्या हरदाजवळ एकाच ठिकाणी दोन एक्सप्रेसचा अपघात घडलाय. या गंभीर अपघातानंतर आत्तापर्यंत २५ जणांचे मृतदेह हाती लागलेत. परंतु, मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. 

Updated: Aug 5, 2015, 09:32 AM IST
जनता, कामायनी रेल्वे अपघात : रेल्वे हेल्पलाईन क्रमांक title=

हरदा : मध्यप्रदेशच्या हरदाजवळ एकाच ठिकाणी दोन एक्सप्रेसचा अपघात घडलाय. या गंभीर अपघातानंतर आत्तापर्यंत २५ जणांचे मृतदेह हाती लागलेत. परंतु, मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. 

हरदाच्या खिडकिया स्टेशननजिक झालेल्या अपघातात जनता एक्सप्रेसचे ५ तर कामायनी एक्प्रसेसचे ७ डब्बे रुळावरून घसरले. 

बचाव कार्य जवळपास पूर्ण होत आलंय. परंतु, या दुर्घटनेमुळे मुंबई-इटारसी रुळावरून प्रवास करणाऱ्या जवळपास ३५ अन्य रेल्वेंना फटका बसलाय.

या अपघातातील जखमींशी संपर्क साधण्यासाठी रेल्वे हेल्पलाईन क्रमांक... 

  • भोपाळ - 0755 4001609

  • हरदा - 9752460088

  • बीना - 07580 222052

  • इटारसी - 07572 241920

  • वाराणसी -5422-503814

  • मुंबई - 0222-5280005

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.