श्रीनगर : जम्मू-काश्मीर सरकार कठोर पावले उचलत, कोणत्याही अफवा पसरून काश्मीरमधील वातावरण बिघडू नये, यासाठी आता व्हॉट्सअॅप न्यूज ग्रुप उघडण्यासाठी आता लायसन्स अनिवार्य करण्याचा विचार केला आहे.
हांडवारात नुकत्याच झालेल्या निदर्शनांदरम्यान ५ नागरिकांना जीव गमवावा लागला. आता काश्मीरमध्ये ३ दिवस इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. यानंतर सरकारने हा निर्णय घेतला आहे.
आता व्हॉट्सअॅप न्यूज ग्रुप उघडण्यासाठी अॅडमिनला येत्या १० दिवसांत सरकारी अधिकाऱ्यांकडे अर्ज करून परवाना मागावा लागेल.
ग्रुपवर टाकण्यात आलेल्या कोणत्याही पोस्ट्साठी त्या ग्रुपचा अॅडमिन जबाबदार असेल, असे कुपवाडा जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयातर्फे जारी करण्यात आलेल्या परिपत्रकात म्हटलंय, लायसन्सचा नियम हा फक्त जम्मू-काश्मीरसाठी असेल.