...आणि महिलांनी रात्री अंगावर ओतल्या पाण्याच्या बादल्या!

अफवा कशा जन्माला येतात आणि त्या कशा झटक्यात पसरतात याचं एक उदाहरणचं उत्तर प्रदेशातल्या अतरौलीमध्ये पाहायला मिळालंय. 

Updated: Sep 24, 2014, 06:58 PM IST
...आणि महिलांनी रात्री अंगावर ओतल्या पाण्याच्या बादल्या! title=

अतरौली : अफवा कशा जन्माला येतात आणि त्या कशा झटक्यात पसरतात याचं एक उदाहरणचं उत्तर प्रदेशातल्या अतरौलीमध्ये पाहायला मिळालंय. 

अतरौलीमधल्या कलियानपूर गावातील ही घटना... 2400 लोकसंख्या असलेल्या या गावातील महिलांची संख्या आहे 850...

सोमवारी इथं एक अफवा निघाली... एका महिलेनं जुळ्या मुलांना जन्म दिला... आणि जन्माला येताच दोन्हीही मुलं धावत धावत अचानक गायब झाले... असं सांगण्यात आलं. पाहतापाहताच, ही दैवी शक्तीची अपकृपा असल्याची टूम गावभर पसरली.

हीच दैवी अवकृपा इतर आयांवरही होऊ नये... यासाठी यावर उपाय शोधण्यात आला... ज्या महिलेला जितकी मुलगे आहेत त्या महिलांनी तितक्या बादल्या पाणी अंगावर ओतून घ्यावं... तेही रात्री 12 ते पहाटे 4 वाजेपर्यंत... मग काय, आपल्या मुलांवरचं संकट टाळण्यासाठी प्रत्येक ‘आई’ही तयार झाली. अर्ध्या रात्री गावातील हँडपंपमधून पाणी भरून घेण्यासाठी महिलांनी एकच गर्दी केली. 

मंगळवारी या प्रकाराची चर्चा प्रत्येकाच्या तोंडी होती. पण, अंधश्रद्धा लोकांच्या मनात घर करण्यासाठी किंचितही वेळ घेत नाही, याचं उदाहरण या निमित्तानं अनेकांना दिसलं.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.