बँक कर्मचारी पुन्हा एकदा 'सोईस्कर' संपावर!

आपल्या सोयीनं संपावर जाण्याची परंपरा बँक कर्मचाऱ्यांच्या संघटनेनं कायम ठेवलीय. देशातल्या पाच लाक बँक कर्मचाऱ्यांनी उद्या एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारलाय.

Updated: Jan 7, 2016, 10:13 AM IST
बँक कर्मचारी पुन्हा एकदा 'सोईस्कर' संपावर! title=

मुंबई : आपल्या सोयीनं संपावर जाण्याची परंपरा बँक कर्मचाऱ्यांच्या संघटनेनं कायम ठेवलीय. देशातल्या पाच लाक बँक कर्मचाऱ्यांनी उद्या एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारलाय.

उद्या शुक्रवार, त्यानंतर शनिवार आणि रविवारची सुट्टी येत असल्याने सलग तीन दिवस बँका बंद राहणार आहेत. परिणामी लाखो ग्राहकांची परवड होणार आहे.

स्टेट बँक ऑफ बिकानेर अ‍ॅन्ड जयपूर, त्रावणकोर, म्हैसूर, हैदराबाद आणि पतियाळा या पाच बँकांचे स्टेट बँकेत विलीनीकरण करण्याच्या धोरणाविरोधात 'ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन'ने संपाची हाक दिली आहे.