कोलकाता: पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज सकाळी आपल्या दौऱ्याची सुरुवात दक्षिणेश्वर काली मंदिरात जाऊन देवीचं दर्शन घेऊन केली.
काली मातेची पूजा करुन दर्शन घेतल्यानंतर त्यांनी हुबळी नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या बेलूर मठ मंदिर परिसरात संतांचीही भेट घेतली. रामकृष्ण मिशनशी जोडलेल्या या संतांशी पंतप्रधानांनी चर्चा केली.
स्वामी विवेकानंद ज्या खोलीत राहायचे त्या खोलीतही मोदी गेले. स्वामी विवेकानंदांच्या समाधिवर जाऊन त्यांनी ध्यानही केलं. यानंतर पंतप्रधान आसनसोल इथं एका कारखान्याचं उद्धाटन करणार असून एका रॅलीतही सहभागी होणार आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.