मोदींचा ब्लॉगः मला हनिमून पिरियड मिळाला नाही

 मला १०० दिवसांचा हनीमून पिरीयड नाही मिळाला आणि १०० तासात माझ्यावर टीका करण्यात आल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खेद व्यक्त केला. मोदी यांनी आपल्या सरकारला एक महिना पूर्ण झाल्याबद्दल आपले विचार एका ब्लॉगच्या माध्यामातून व्यक्त केले आहेत.  देशहितासाठी काम करत आहोत आणि यापुढेही करणार आहोत असे त्यांनी यात नमूद केले.

Updated: Jun 27, 2014, 03:32 PM IST
मोदींचा ब्लॉगः मला हनिमून पिरियड मिळाला नाही title=
सौजन्य, नरेंद्री मोदी ब्लॉग

नवी दिल्ली :  मला १०० दिवसांचा हनीमून पिरीयड नाही मिळाला आणि १०० तासात माझ्यावर टीका करण्यात आल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खेद व्यक्त केला. मोदी यांनी आपल्या सरकारला एक महिना पूर्ण झाल्याबद्दल आपले विचार एका ब्लॉगच्या माध्यामातून व्यक्त केले आहेत.  देशहितासाठी काम करत आहोत आणि यापुढेही करणार आहोत असे त्यांनी यात नमूद केले.

एक महिन्यापूर्वी आम्ही जेव्हा सरकार स्थापन केली, तेव्हा मला वाटत होतं की मी या ठिकाणी नवीन आहे आणि काही व्यक्तिंनी वाटत होते की गोष्टी समजण्यास एक वर्ष लागेल. पण एका महिन्यानंतर मला असे वाटत नाही. माझा आत्मविश्वास आणि हिंमत वाढली असल्याचे मोदी यांनी आपल्या ब्लॉगमध्ये मत मांडली आहे.

बऱ्याच क्षेत्रात सुधारणेला वाव असल्याचे मत व्यक्त करून पंतप्रधान म्हणतात, दिल्लीत माझ्यासाठी एक मोठी कसोटी आहे. काही लोकांना मला समजवायचे आहे की, या देशात सकारात्मक बदल करण्यासाठी आम्ही संपूर्ण इमानदार आहोत. असे लोक सरकारमध्ये आणि सरकारच्या बाहेरही आहेत.

आपल्या ब्लॉगमध्ये पंतप्रधानांनी गेल्या महिन्याभरात झालेल्या वादांवरही प्रकाश टाकला आहे, त्याच्यानुसार, बरेचसे असे वाद आहे की त्यांचा मोदी सरकारशी कोणतेही घेणे-देणे नाही. त्यांनी लिहिले की, गेल्या महिन्याभरात अशा काही गोष्टी झाल्या की ज्यांचे आमच्या सरकारशी कोणताही संबंध नव्हता. पण तरीही वाद झाला. मी कोणावर दोषारोप करीत नाही, पण मला असे वाटते की, एक अशी व्यवस्था बनवली पाहिजे की, ज्याने योग्य बाब योग्य व्यक्तींपर्यंत पोहचली पाहीजे. मला विश्वास आहे, की परिस्थिती नक्की बदलेल.

ते म्हणतात, प्रत्येक सरकारला असा काही वेळ मिळतो, की त्याला मीडियातील मित्र हनीमून पिरियड म्हणतात आणि मागील सरकारांना १०० दिवसांपेक्षा अधिक हनिमून पिरियड मिळाला होता. मोदींनी खेद व्यक्त केला, की मला असा कोणताही काळ मिळाला नाही. त्यांनी लिहिले की, १०० दिवस तर विसरून जा, १०० तासांत आरोप व्हायला लागले होते. पण कोणाला केवळ देशाची जिवापाड सेवा सेवा करायची असेल तर अशा गोष्टींनी फरक पडत नाही. त्यामुळे मी काम करतो आणि खूप संतुष्टही आहे.

आजच्या दिवशी भारतात १९७५मध्ये आणीबाणी लागू करण्यात आल्याचाही उल्लेख मोदींनी ब्लॉगमध्ये केला. आणीबाणीत आपल्या बोलण्यावर आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आली होती. ते लिहितात, चांगल्या प्रशासनासाठी मजबूत संस्था निर्माण करणे गरजेचे आहे. त्यामुळे अशा प्रकारचे काळे दिवस आपल्या पुन्हा पाहावे लागणार नाहीत. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.