गोवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात शनिवारी चर्चा झाली. या चर्चेमध्ये जिनपिंग यांनी दहशतवाद तसंच एनएसजी सदस्यत्वाबाबत चर्चा झाली.
संयुक्त राष्ट्रसंघातील सुरक्षा समितीत कायमचे सदस्यत्व मिळावे यासाठी भारताच्या प्रयत्नांना चीनकडून पाठिंबा मिळण्याची शक्यता नसली तरी दहशतवाद हा उभय देशांसाठी समान चिंतेचा विषय ठरलाय.
दहशतवादाचा सामना करण्यासाठी समन्वय अधिक वाढवणे आवश्यक असल्याचे दोन्ही देशांनी मान्यही केले..मात्र संयुक्त राष्ट्रामध्ये पाकिस्तानी दहशतवादी मसूद अझहरवर बंदी घालण्यासाठी भारतानं मांडलेल्या प्रस्तावाला पाठींबा देण्याचं कोणतंही आश्वासन दिलं नाही.
चीननं खोडा घातल्यामुळे मसूद अझहरवरील बंदीचा प्रस्ताव रखडलाय. जिनपिंग यांच्यासोबत झालेल्या चर्चेत मोदींनी एनएसजी सदस्यत्वाचाही मुद्दा उपस्थित केला. ही बैठक फलदायी झाल्याचं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता विकास स्वरुप यांनी सांगितलं.