www.24taas.com, झी मीडिया, पणजी
लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींची गोव्यात रविवारी जाहीर सभा होतेय. या सभेसाठी भाजपनं जय्यत तयारी केलीय. भूतो न भविष्यती अशा या सभेसाठी तब्बल दीड लाख नागरिकांनी नोंदणी केलीय.
गोव्याच्या इतिहासातील मोठी सभा असून यासाठी साधारणपणे ७० नेते बसतील असं भव्य व्यासपीठ उभारण्यात आलंय. सभेसाठी महिला, विद्यार्थी, युवक यांच्यामध्ये पाच रुपये स्वीकारुन नोंदणी करण्यात आलीय.
या सभेला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह, गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. सभा जवळून पाहता यावी यासाठी सहा मोठे स्क्रीन उभारण्यात आलेत.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.