सुशीलकुमार शिंदे खोटे बोललेत..दाऊदला आणणे अशक्य

मोस्ट वाँटेड दाऊद इब्राहीमला भारतात आणणं शक्य नसल्याची स्पष्टोक्ती केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केलीय. ते सोलापुरात एका कार्यक्रमात बोलत होते. पाकिस्तानसोबत भारताचा गुन्हेगार प्रत्यार्पण करार नाही. त्यामुळे दाऊदला भारतात घेऊन येणं शक्य नसल्याचं शिंदे म्हणालेत. यावरून दाऊदला भारतात आणणार असल्याच त्यांनी याआधी केलेलं विधान खोटं असल्याचं स्पष्ट झालंय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jan 11, 2014, 11:17 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, सोलापूर
मोस्ट वाँटेड दाऊद इब्राहीमला भारतात आणणं शक्य नसल्याची स्पष्टोक्ती केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केलीय. ते सोलापुरात एका कार्यक्रमात बोलत होते. पाकिस्तानसोबत भारताचा गुन्हेगार प्रत्यार्पण करार नाही. त्यामुळे दाऊदला भारतात घेऊन येणं शक्य नसल्याचं शिंदे म्हणालेत. यावरून दाऊदला भारतात आणणार असल्याच त्यांनी याआधी केलेलं विधान खोटं असल्याचं स्पष्ट झालंय.
काय म्हणाले होते आधी
अफजल गुरु आणि कसाबनंतर आता दाऊदला भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं सुशीलकुमार शिंदे यांनी म्हटलंय. दाऊदचा पत्ता हाती लागला असून त्याल मुसक्या बांधण्यासाठी अमेरेकेच्या FBIची मदत घेतली जात असल्याचंही शिंदेंनी सांगितलंय.
सोलापुरात BSFच्या बटालियन केंद्राची पायाभरणी आज त्यांच्या हस्ते झाली. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. अंडरवर्ल्ड डॉन दाऊदला लवकरच भारतात आणणार, असा पुनरुच्चार शिंदे यांनी केला आहे. दाऊदच्या हालचालींवरही त्यांचं लक्ष आहे. त्यामुळे सगळं योग्य झालं तर दाऊदला लवकरच भारतात आणू, असं शिंदे यांनी म्हटलं आहे.
सुशीलकुमार शिंदे गृहमंत्री झाल्यानंतर २६/११ मुंबई हल्ल्यातील प्रमुख आरोपी अजमल कसाब आणि संसद हल्ल्यातील आरोपी अफजल गुरु यांना फासावर लटकवण्यात आलं होतं. आता त्याच साखळीत १९९३ मुंबई साखळी स्फोटाचा सूत्रधार दाऊदला भारतात आणण्याचा इरादा शिंदे यांनी बोलून दाखवला आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.