‘पठानी कुर्त्या’त कसे दिसतील मोदी?

गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदींचं राहणीमान आणि स्वत:ला जनतेसमोर प्रेझेंट करण्याची पद्धती नेहमी अपडेट होत आलीय. आगामी लोकसभा निवडणुकीदरम्यान हेच मोदी ‘पठानी कुर्त्या’त दिसले तरी आश्चर्य वाटायला नको!

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Oct 16, 2013, 03:58 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, अहमदाबाद
गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदींचं राहणीमान आणि स्वत:ला जनतेसमोर प्रेझेंट करण्याची पद्धती नेहमी अपडेट होत आलीय. आगामी लोकसभा निवडणुकीदरम्यान हेच मोदी ‘पठानी कुर्त्या’त दिसले तरी आश्चर्य वाटायला नको!
होय, नरेंद्र मोदींना येणाऱ्या निवडणुकीत तुम्ही पठानी कुर्त्यातही पाहणार आहात... कदाचित आपली कट्टर हिंदूत्ववादी असल्याची इमेज पुसून काढण्यासाठी मोदी पठानी कुर्त्याची मदत घेणार आहेत.
सध्या बटनांसहीत अर्ध्या बाह्यांच्या ‘मोदी कुर्त्यात’ दिसणारे गुजरातचे मुख्यमंत्री सध्या आपला लूक बदलण्याच्या तयारीत आहेत. एका वर्तमानपत्रात मोदींनी मागच्या २५ वर्षांपासून त्यांचे ड्रेस स्टायलिस्ट बिपिन चौहान यांचा हवाला देऊन ही बातमी प्रकाशित केलीय. बिपिन चौहान यांच्या म्हणण्यानुसार, मोदींनी नुकताच त्यांना एक पठानी सूट दाखवला होता, जो चौहान यांनीच १९९४ साली मोदींसाठी तयार केला होता. मोदींनी हाच सूट हातात घेऊन आपल्याला याच पद्धतीचा सूट हवाय, असं चौहान यांना सांगितलं.
चौहान यांच्या मते, वेगवेगळ्या फॅब्रिक्सच्या पठानी सूटचे ट्रेंड येण्यासाठी तयार आहेत... आणि मोदींचाही संध्याकाळच्या वेळी पठानी सूट घालण्याची योजना आहे.
पठानी कुर्ता लांब बाह्यांचा कुर्ता असतो जो मुसलमान पुरुष सणासुदीच्या काळात परिधान करतात... आणि मुस्लिम पुरुषांमध्ये हा लोकप्रियदेखील आहे. यासोबत सलवार परिधान केला जातो.
चौहान यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोदींचं आपल्या कपड्यांच्या फिटिंगकडे खूप लक्ष असतं. ‘मी कधीही माझा आवाज, कपडे आणि डोळ्यांच्या बाबतीत तडजोड करत नाही’ असं मोदींनी एकदा म्हटलंदेखील होतं.

बिपिन चौहान पुरुषांच्या कपडे तयार करणाऱ्या एका मोठ्या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. चौहान यांच्या म्हणण्यानुसार, ‘मोदींना बंद गळ्याचा आणि नेहरु जॅकेट स्टाईलपासून नेहमीच दूर राहतात. परंतु यावेळेस दिल्लीच्या थंड वातावरणात ते हे कपडेही ट्राय करू शकतात’
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.