सिलिकॉन व्हॅली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फेसबुक मुख्यालयात मार्क झकरबर्ग यांच्याशी फेसबुक चॅट केले, त्यात त्यांनी भारताची अर्थव्यवस्था २० ट्रलियन डॉलर बनवणार असल्याचं म्हटलं आहे.
सिलिकॉन व्हॅलीतील टाऊन हॉलमध्ये मार्क झकरबर्ग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक मुलाखत घेतली, ही मुलाखत फेसबुकने जगभर लाईव्ह केली.
प्रश्नोत्तर विचारतांना नरेंद्र मोदी यांच्या आईवडिलांबाबत विचारल्यानंतर मोदी भावुक झाले.
नरेंद्र मोदी म्हणाले, आम्ही खूप गरीब होतो, माझी परिस्थितीमुळे आई शेजारी धुणी-भांडी धुण्याचं काम करायची, हे सांगतांना मोदींच्या डोळ्यात पाणी आलं.
हे सांगतांना मोदी म्हणाले, "एक आई आपल्या मुलांना मोठं करण्यासाठी किती कष्ट घेते, हे फक्त मोदीच्या बाबतीत लागू पडत नाही, भारतात अशा अनेक माता आहेत, ज्यांनी आपल्या मुलांच्या स्वप्नासाठी आपल्य़ा जीवनाचा त्याग केला."
मोदी पुढे म्हणाले, माझी आई शिकलेली नाही, ती ९२ वर्षांची असेल, तरीही आज ती आपली कामं स्वत: करते.
नरेंद्र मोदी यांनी मार्क झकरबर्ग यांच्या आई-वडिलांचंही कौतुक केलं, त्यांनी जगाला एक मोठं सोशल नेटवर्किंग देणाऱ्या मुलाला जन्म दिल्याबद्दल त्यांनी आभार मानले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.