पत्नीनं नकार दिला म्हणून पतीनं प्रायव्हेट पार्टमध्ये हात घालून केली हत्या

शारीरिक संबंधास नकार दिला म्हणून बरेलीत एका व्यक्तीनं आपल्या पत्नीची हत्या केलीय. या जोडप्याच्या लग्नाला १५ वर्ष झाले होते आणि त्यांना १० वर्षांचा मुलगाही होता.

Updated: Sep 27, 2015, 03:35 PM IST
पत्नीनं नकार दिला म्हणून पतीनं प्रायव्हेट पार्टमध्ये हात घालून केली हत्या title=

बरेली: शारीरिक संबंधास नकार दिला म्हणून बरेलीत एका व्यक्तीनं आपल्या पत्नीची हत्या केलीय. या जोडप्याच्या लग्नाला १५ वर्ष झाले होते आणि त्यांना १० वर्षांचा मुलगाही होता.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार हत्या केल्यानंतर आरोपी पत्नीच्या मृतदेहाशेजारी बसून दारू पित होता. महिलेच्या बहिणीनं तक्रार केल्यानंतर पोलिसांना ही घटना कळली. 

आणखी वाचा - लहान मुलांच्या लैंगिक शोषणाविरोधात कैलास सत्यार्थी यांचा व्हिडीओ

पोलिसांनी सांगितलं, 'जेव्हा आम्ही तिथं पोहोचलो तेव्हा मृतदेह पडलेला होता. आरोपी तिथंच बाजूला बसला होता. महिलेच्या शरीरावर बाहेरून काहीही जखम दिसत नव्हती. मात्र तिथं खूप रक्त सांडलं होतं.'

राजीव नावाच्या या व्यक्तीनं पत्नीच्या हत्येचा गुन्हा कबुल केलाय. त्याची पत्नी घराबाहेर दुसऱ्या कुणाला भेटायला जात होती, असा त्याला संशय होता. तिनं शारीरिक संबंधास नकार दिल्यानं आपला संपूर्ण डावा हात तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये टाकल्याचं त्यानं सांगितलं. पोलीस अजून पोस्टमार्टेम रिपोर्टची वाट पाहत आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राजीव याची मानसिक स्थिती बरोबर नाही. रात्रभर त्याला कोठडीत ठेवल्यानंतर कोर्टात उपस्थित करण्यात आलं. तिथं त्याला १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय.

आणखी वाचा - पाहा कसा, एका महिलेनं ६ महिन्यांमध्ये ८५ मुलांना दिला 'जन्म'!

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.