मोदींच्या मंत्रिमंडळाचा होणार विस्तार, नवे सहा चेहरे तर काहींची हकालपट्टी

पुढील काही दिवसांत पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता अधिक आहे. अर्धा डझन नवीन चेहऱ्यांना संधी मिळू शकते. तर दोन ते तीन मंत्र्यांची हकालपट्टी होऊ शकते, अशी माहिती सूत्रांकडून सांगण्यात आलेय.

Updated: Jun 17, 2016, 09:49 PM IST
मोदींच्या मंत्रिमंडळाचा होणार विस्तार, नवे सहा चेहरे तर काहींची हकालपट्टी title=

नवी दिल्ली : पुढील काही दिवसांत पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता अधिक आहे. अर्धा डझन नवीन चेहऱ्यांना संधी मिळू शकते. तर दोन ते तीन मंत्र्यांची हकालपट्टी होऊ शकते, अशी माहिती सूत्रांकडून सांगण्यात आलेय.

१९ ते २३ जून दरम्यान केंद्रीय मंत्रिमंडळांचा विस्तार होण्याची शक्यता अधिक आहे. सरकारकडून तयारी झालेय. मात्र, राष्ट्रपतींची वेळ मिळण्यासाठी प्रतिक्षा असल्याचे सांगण्यात येत आहे. राष्ट्रपती १८ जूनला आफ्रिका दौऱ्यावरुन मायदेशात येत आहेत. २१ जून चांगला दिवस आहे. मात्र, राष्ट्रपती दिल्लीबाहेर एक दिवस असणार आहेत. त्यामुळे १९ किंवा २० जूनला विस्तार होण्याची अधिक शक्यता आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशमधून किमान दोन नवे चेहरे केंद्रीय मंत्रिमंडळात असू शकतात. अनुप्रिया पटेल आणि गौरखपूरचे खासदार योगी आदित्यनाथ यांना लॉटरी लागण्याची शक्यता आहे. तसेच जातीचे राजकारण असल्याकारणामुळे आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांची जागा राज्यातील वरिष्ठ नेते रमन डेका यांना संधी आहे.

पुढील वर्षी उत्तराखंडमध्ये निवडणुका आहेत. त्यामुळे उत्तरखंडला प्रतिनिधित्व मिळण्याची शक्यता आहे. तर राजस्थान कोठ्यातून दोघांना संधी मिळू शकते. नजमा हेप्पतुल्ला या मंत्रिमंडळातून बाहेर पडू शकतात. तर राज्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी बढती मिळण्याची शक्यता आहे.