पानिपत : नारायण साईविरोधातील बलात्काराच्या प्रकरणातील प्रमुख साक्षीदारावर आज अज्ञातांनी गोळीबार केला. नारायण साई हा आसाराम बापूंचा मुलगा आहे, हरियाणाच्या पानिपतमध्ये अज्ञातांनी महेंद्र चावला या प्रमुख साक्षीदारावर गोळीबार केला.
ही घटना पानिपत जिल्ह्यातील सनोली गावात घडली. काही अज्ञातांनी महेंद्र चावलावर गोळीबार केला असून त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती रोहतक रेंजचे पोलिस महानिरीक्षक श्रीकांत जाधव यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले. आसाराम आणि त्याचा मुलगा नारायम साईविरोधात बलात्कार प्रकरणातील साक्षीदारांवर हल्ल्याचा हे सहावं प्रकरण आहे.
साक्षीदारांच्या सुरक्षेच्या प्रश्नामुळे त्यांना बंदुकधारी पोलिसांची सुरक्षा पुरवली गेली होती. मात्र तरीही त्यांच्यावर हल्ले होत आहेत. आता असा प्रश्न उपस्थित होतो आहे की, महेंद्र चावलावर हल्ला झाला, त्यावेळी त्याला सुरक्षा पुरवणारा बंदुकधारी पोलिस कुठे होता?
नारायण साईविरोधात सुरतमध्ये एका महिलेने बलात्काराची तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर डिसेंबर २०१३ मध्ये नारायण साईविरोधात अटक करण्यात आली व तेव्हापासून तो सुरत जेलमध्येच आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.