चरखी दादरी : माझ्या मुलींना सुविधा पुरवा, त्या ४ ऑलिंपिक मेडल मिळवून देतील, असं महावीर फोगट यांनी म्हटलं आहे. विनेश फोगट आणि बबिता कुमारी फोगट या महावीर फोगट यांच्या मुली आहेत.
द्रोणाचार्य अवॉर्डसाठी नॉमिनेट रेसलिंग कोच महावीर फोगट यांनी रिओ ऑलिंपिकमध्ये रेसलर मुलगी बबिताच्या पराभवाचे खापर तिच्या कोचवर आणि ट्रेनिंग कॅम्पवर फोडले आहे.
खराब प्रदर्शनाला भारतीय पैलवानांनाही जबाबदार धरत महावीर म्हणाले, 'जर सरकारने खेळाडूंना चांगल्या सुविधा दिल्या तर मी चॅलेज देऊन सांगतो ऑलिंपिकमधून चार मेडल घेऊन येईन, असे करू शकलो नाही तर पैलवान खेळाडूंवर खर्च झालेला पै ना पै माझ्या खिशातून सरकारला परत करेन, असंही फोगट यांनी म्हटलंय.