नवी दिल्ली : दिल्लीतल्या निर्भया बलात्कार प्रकरणातला दोषी विनय शर्मानं तिहाड जेलमध्ये आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. विनय शर्माला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याची प्रकृती गंभीर आहे.
विनय शर्मानं जेलमध्येच स्वत:ला गळफास लावून घेतला. त्यानं आत्महत्येचा प्रयत्न करण्याआधी काही औषधं घेतल्याचंही बोललं जात आहे. विनयला तिहाड जेलच्या 8 नंबर जेलमध्ये ठेवण्यात आलं होतं.