'ट्रिपल तलाकविरोधात मुस्लिमांनी पुढे यावं'

ट्रिपल तलाकविरोधात मुस्लिमांनी पुढे यावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं आहे. 

Updated: Apr 29, 2017, 06:33 PM IST
'ट्रिपल तलाकविरोधात मुस्लिमांनी पुढे यावं' title=

नवी दिल्ली : ट्रिपल तलाकविरोधात मुस्लिमांनी पुढे यावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं आहे. मुस्लिम समाजातील नागरिक पुढे येतील आणि ट्रिपल तलाकची पद्धत बंद करण्यासाठीचा मार्ग शोधतील अशी आशाही मोदींनी व्यक्त केली आहे.

ट्रिपल तलाकवर बोलताना मोदींनी हिंदू समाजातल्या विधवा विवाहाबाबतही भाष्य केलं. राजा राममोहन रॉय यांनी विधवांच्या विवाहाचा विचार मांडला तेव्हा त्यांनाही मोठा विरोध झाला होता पण ते मागे हटले नाहीत, असं मोदी म्हणाले आहेत.