मुंबई : मुंबई दहशतवादी हल्ल्याप्रकरणी एक खळबळजनक माहिती आरटीआय अंतर्गत बाहेर आलीय. मुंबईत दहशतवाद्यांनी हल्ला केला तेव्हा भारताचे गृहसचिव मधुकर गुप्ता इस्लामाबादमध्ये पाहुणचार झोडत होते.
एवढचं नाही तर गृहसचिव आणि इतर अधिकाऱ्यांनी आपला पाकिस्तानतल्या मुरीच्या हिल रिट्रीट हॉटेलमधला मुक्काम एका दिवसांने वाढवून घेतल्याचीही माहिती समोर आलीय.
गृहसचिव स्तरावरचा अधिकारी चर्चा झाल्यावर पाकिस्तानातला आपला मुक्काम का वाढवून घेईल असा सवाल यामुळे निर्माण झालाय.
यामुद्द्यावर पाकिस्तानच्या गृहमंत्र्यांशी आपली चर्चा 27 नोव्हेंबरलाच होऊ शकली असती त्यामुळे एक दिवस वाढवून घ्यावा लागला असं स्पष्टीकरण गृहसचिवांनी दिलं होतं.