रेल्वे बजेट : मुंबईशी संबंधित 10 महत्वाच्या घोषणा

रेल्वे मुंबईची लाईफ लाईन असली तरी त्या तुलनेने बजेटमध्ये झालेल्या घोषणा, निराशाजनक असल्याचं मुंबईकरांनी म्हटलं आहे.मात्र रेल्वे बजेटमध्ये मुंबईशी संबंधित काही महत्वाच्या घोषणा आहेत. मुंबईशी संबंधित काही महत्वाच्या घोषणांमध्ये लोकल ट्रेन्समध्ये एसी बसवण्यात येणार आहेत. तसेच सीसीटीव्ही लावण्यात येणार आहेत.

Updated: Feb 26, 2015, 02:39 PM IST
रेल्वे बजेट : मुंबईशी संबंधित 10 महत्वाच्या घोषणा title=

मुंबई : रेल्वे मुंबईची लाईफ लाईन असली तरी त्या तुलनेने बजेटमध्ये झालेल्या घोषणा, निराशाजनक असल्याचं मुंबईकरांनी म्हटलं आहे.मात्र रेल्वे बजेटमध्ये मुंबईशी संबंधित काही महत्वाच्या घोषणा आहेत. मुंबईशी संबंधित काही महत्वाच्या घोषणांमध्ये लोकल ट्रेन्समध्ये एसी बसवण्यात येणार आहेत. तसेच सीसीटीव्ही लावण्यात येणार आहेत.

 मुंबईतील काही लोकल लवकरच एसी करणार

लोकलच्या डब्ब्यात सीसीटीव्ही बसवणार, महिला डब्यांचाही समावेश
 
मुंबई लोकलच्या एमयूटीपी थ्री अंतर्गत 6 मोठ्या प्रकल्पांचा समावेश
 
पनवेल ते कर्जत दुपदरीकरणासाठी 1 हजार 561 कोटींची तरतूद
 
ऐरोली ते कळवा उन्नत मार्गासाठी 428 कोटीची तरतूद

मुंबईतील लोकल स्थानकं विकसित करण्यावर भर
 
रेल्वे स्थानकाच्या विकासासाठी 1950 कोटी रूपये
 
ट्रेसपास कंट्रोलिंगसाठी 520 कोटी रूपये
 
विरार ते डहाणू चौपदीकरणासाठी 3 हजार 555 कोटी
 
लोकलच्या कोचेससाठी 565 कोटीची तरतूद

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.