नवी दिल्ली : रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी आज मोदी सरकारचे पहिला पूर्ण बजेट सादर केले. रेल्वे बजेटमधील या खास १५ गोष्टी... जाणून घ्या...
१) प्रवासी भाड्यात वाढ होणार नाही
२) दलालांना रोखण्यासाठी चार महिने अगोदर रिझर्वेशन होणार, यापूर्वी दोन महिन्यांपूर्वी तिकीट बूक करण्यात येत होते.
३) नव्या गाड्यांची घोषणा नाही झाली. सरकार प्रथम आढावा घेणार, नंतर नव्या गाड्यांची घोषणा. असे प्रथमच झाले की नव्या ट्रेनच्या घोषणा केलेल्या नाहीत.
४) विना रिझर्वेशन तिकीट काढण्यासाठी मोबाईल अॅप्लिकेशन ५ मिनिटात तिकीट बूक होणार.
५) महिलांच्या सुरक्षेसाठी महिलांच्या डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा
६) डिस्पोझेबल बेड रोल, व्हिलचिअर आणि जेवणाची ऑनलाइन बुकिंग होणार
७) ई- तिकिटींग आता हिंदी- इंग्रजी शिवाय इतर भाषांमध्ये
८) ज्येष्ठ नागरिंकांसाठी लोअर बर्थला प्राधान्य देणार त्याचा कोटा वाढविणार
९) जनरल डब्ब्यांमध्ये मोबाइल चार्जिंग पॉइंट देणार
१०) अतुल्य भारतासाठी अतुल्य रेल्वे सेवा सुरू करणार
११) कंपनीच्या नावावर ट्रेन सुरू होणार, ट्रेन स्पॉन्सर होणार
१२) प्रवाशांच्या सुरक्षेसाठी १८२ आणि इतर सुरक्षेसाठी १३८ हेल्पलाइन नंबर असणार हे क्रमांक संपूर्ण देशात काम करणार
१३) दिल्ली-मुंबई, दिल्ली-कोलकत्ता सह ९ मार्गांवर २०० किलोमीटर स्पीड ट्रेन धावणार
१४) गाड्यांची टक्कर रोखण्यासाठी अलार्म लावणार
१५) रेल्वे गाड्यांमधील १७ हजार टॉयलेट बदलणार आणि बायो टॉयलेट बसविणार, विमानाप्रमाणे व्हॅक्युम टॉयलेट बसविणार
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.