आज रात्री १२ पर्यंत भरू शकता आपला इन्कम टॅक्स रिटर्न

२०१४-२०१५ या आर्थिक वर्षासाठीचा वैयक्तिक आयकर परतवा भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. सरकारनं यंदा आयकर परतावा भरण्यासाठीच्या मुदतीत आधीच एक महिन्याची मुदत वाढ दिली होती. त्यानंतर ही मुदत आजपर्यंत वाढवण्यात आली होती. त्यामुळे आज मध्यरात्रीपर्यंत आयकर परतावा भरण्याची संधी तुमच्याकडे आहे. 

Updated: Sep 7, 2015, 11:51 AM IST
आज रात्री १२ पर्यंत भरू शकता आपला इन्कम टॅक्स रिटर्न title=

मुंबई: २०१४-२०१५ या आर्थिक वर्षासाठीचा वैयक्तिक आयकर परतवा भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. सरकारनं यंदा आयकर परतावा भरण्यासाठीच्या मुदतीत आधीच एक महिन्याची मुदत वाढ दिली होती. त्यानंतर ही मुदत आजपर्यंत वाढवण्यात आली होती. त्यामुळे आज मध्यरात्रीपर्यंत आयकर परतावा भरण्याची संधी तुमच्याकडे आहे. 

आणखी वाचा - टॅक्स रिफंड मिळवायचा असेल तर 'ऑनलाईन'च रिटर्न भरा!

त्यानंतर मात्र आय़कर आणि आयकर परतावा भरल्यास बसलेल्या करावर दरमहा १ टक्क्याच्या दरानं दंड आकारण्याची तरतूद आयकर कायद्यात आहे. त्यामुळं दंड वाचवण्यासाठी आयकराचा भरणा करण्याचं आवाहन केंद्रीय आयकर विभागानं केलंय. आयकर परतवा किंवा आयकर भरण्याची सुविधा आता ऑनलाईनही उपलब्ध आहे. शिवाय जर तुमच्या पगारातून वाढीव आयकर कापला गेला असेल, तर तो परत मिळवण्यासाठी आयकर परतावा आवश्यक आहे. 

आणखी वाचा - शनिवार-रविवारीही भरा 'इन्कम टॅक्स रिटर्न'

यंदा ऑनलाईन परतावा भरणाऱ्या करदात्यांनी जर आधार क्रमांक पॅनकार्डशी जोडला तर अगदी काही दिवसांत रिफंड मिळण्याचीही सुविधाही उपलब्ध झालीय. त्यामुळे त्वरा करा आणि तुमचा आयकर आणि आयकर परतावा भरुन निश्चित व्हावा.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.