www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
हवामान खात्याने येत्या 24 तासात केरळात मान्सून दाखल होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
मान्सून सक्रीय होण्यास अनुकुल परिस्थिती असल्याचं आयएमडीनं म्हटलं आहे. यामुळे देशभरात वेळेवर मान्सून दाखल होणार असल्याने, पुन्हा एकदा सर्वांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
मान्सून येत्या 24 तासात केरळमध्ये, त्यानंतर दक्षिण अरबी समुद्र. यानंतर मालदीवपर्यंत येईल असा अंदाज आहे.
याशिवाय तामिळनाडूतील समुद्रकिनारा आणि बंगालच्या उपसागरातही पुढील 24 तासात मान्सून हजेरी लावणार आहे.
नैऋत्य भारतातील काही भागातही येत्या 48 तासात मान्सून दाखल होईल, असा अंदाज आयएमडीनं व्यक्त केला आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.