मान्सून केरळमध्ये वेळेवर दाखल होण्याची चिन्हं

यंदाचा मॉन्सून सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असला, तरीही केरळमध्ये तो वेळेवर दाखल होण्याची चिन्हे आहेत. 'मॉन्सूनसाठीचे वातावरण सध्या स्थिर आहे. 

Updated: May 10, 2015, 10:50 PM IST
मान्सून केरळमध्ये वेळेवर दाखल होण्याची चिन्हं title=

नवी दिल्ली : यंदाचा मॉन्सून सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असला, तरीही केरळमध्ये तो वेळेवर दाखल होण्याची चिन्हे आहेत. 'मॉन्सूनसाठीचे वातावरण सध्या स्थिर आहे. 

मॉन्सूनचे आगमन वेळेनुसारच असेल, असे आताच्या परिस्थितीनुसार म्हणता येईल,'असे भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. यामुळे केरळमध्ये यंदा १ जूनला मॉन्सून दाखल होऊ शकेल, अशी चिन्हे आहेत. मॉन्सूनच्या प्रगतीचा अहवाल आणि आगमनाची संभाव्य तारीख येत्या १५ मे रोजी जाहीर केली जाणार आहे.

अर्थात, वेळेवर दाखल झाला तरीही 'एल निनो'च्या प्रभावामुळे सरासरी पाऊस कमी असण्याचे अंदाज यापूर्वी वर्तविण्यात आले आहेत. गेल्या वर्षीही सरासरीपेक्षा १४ टक्के कमी पाऊस झाला होता. तसेच, यंदा मार्च-एप्रिलमध्येही अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. कमी पावसाची शक्‍यता लक्षात घेत केंद्र सरकारने खबरदारीच्या उपाययोजनांवर काम करण्यास सुरवात केली आहे. 

'देशातील जवळपास ५८०  जिल्ह्यांमध्ये असे उपाय केले जात आहेत. काही जिल्ह्यांमध्ये स्थानिक परिस्थितीनुसार त्यात बदलही केले जाणार आहेत,' असे कृषिमंत्रालयातील सचिव सिराज हुसेन यांनी सांगितले.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.