नवी दिल्ली : नरेंद्र मोदी सरकारनं तीन वर्ष पूर्ण केलेत... अशावेळी केंद्रातील हे सरकार महिलांना मोठी खुशखबर देण्याची शक्यता आहे.
मंत्र्यांच्या एका गटानं नवी नॅशनल वुमन पॉलिसी अर्थात राष्ट्रीय महिला धोरणाचा एक ड्राफ्ट तयार केलाय. हा ड्राफ्ट केंद्र सरकारकडे सोपवण्यात आलाय. यामध्ये महिलांना आयकरात दिलासा देण्याचीही शिफारस करण्यात आलीय. सुषमा स्वराज यांच्या नेतृत्वाखाली या मंत्रीगटानं महिलांसाठी ही पॉलिसी बनवलीय.
नवीन धोरणानुसार, गर्भवती महिलांना कॅशलेस मेडिकल सुविधा मिळण्यासाठी हेल्थ कार्ड बनवण्याचीशी शिफारस करण्यात आलीय. शिवाय सरकारी नोकरीत महिलांचा सहभाग वाढवण्याचंही तरतूद यात केली गेलीय.
महिलांसाठी जास्तीत जास्त सार्वजनिक टॉयलेटची संख्या वाढवणं तसंच सॅनिटरी नॅपकिन्सवरचा कर रद्द करण्याचीही शिफारस यात करण्यात आलीय.
कॅबिनेटच्या मंजुरीनंतरच ही पॉलिसी जाहीर केली जाईल.