उत्तर प्रदेशात ५० ते ५०० रुपयांपर्यंत विकले जातायत मुलींचे मोबाईल नंबर

उत्तर प्रदेशातून एक धक्कादायक बातमी समोर आलीये. येथे मोबाईल रिचार्ज करणाऱ्या दुकांनावर चक्क मुलींचे नंबर विकले जातायत. सुंदरतेवर आधारित मुलींचे नंबर ५० रुपयांपासून ते ५०० रुपयांपर्यंत विकले जातायत. 

Updated: Feb 4, 2017, 09:44 AM IST
उत्तर प्रदेशात ५० ते ५०० रुपयांपर्यंत विकले जातायत मुलींचे मोबाईल नंबर title=

लखनऊ : उत्तर प्रदेशातून एक धक्कादायक बातमी समोर आलीये. येथे मोबाईल रिचार्ज करणाऱ्या दुकांनावर चक्क मुलींचे नंबर विकले जातायत. सुंदरतेवर आधारित मुलींचे नंबर ५० रुपयांपासून ते ५०० रुपयांपर्यंत विकले जातायत. 

हे ऐकून तुम्ही नक्कीच हैराण झाला असाल. उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ, गोरखपूरसह अनेक शहरांमध्ये असे प्रकार सुरु आहेत. मुलींच्या सुंदरतेवरुन त्यांच्या मोबाईल नंबरच्या किमतीचा आकडा ठरतो. 

साधारण दिसणाऱ्या मुलीचा नंबर ५० रुपयांना विकला जातो तर सुंदर दिसणाऱ्या मुलीच्या नंबरसाठी तब्बल ५०० रुपयांपर्यंतची किंमत वसूल केली जातेय. 

मोबाइल रिचार्ज करणाऱ्या दुकानादारांकडून हे अवैध प्रकार होतायत. अशा प्रकारे मुलींचे नंबर मिळवून त्यांना त्रास दिला जातो. मुलीने फोन उचलल्यास तिच्याशी अश्लील गोष्टी बोलल्या जात असल्याचा प्रकारही समोर आलाय. 

राज्य महिला हेल्पलाईनवर याप्रकारच्या तक्रारींचे प्रमाण वाढल्यानंतर हा प्रकार समोर आलाय. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी महिलांसोबतच्या गैरवर्तणूकीप्रकरणी तक्रार नोंदवण्यासाठी १०९० हा हेल्पलाइन क्रमांक सुरु केला. गेल्या ४ वर्षात या नंबरवर ६ लाखाहून अधिक तक्रारी दाखल झाल्यात.