नवी दिल्ली : रिझर्व्ह बँकेचे पुढचे गव्हर्नर कोण होणार याची उत्सुकता सध्या आर्थिक जगतात शिगेला पोहचली आहे. नव्या गव्हर्नरचं नाव आजच घोषित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
काल यासंदर्भात अर्थमंत्री अरुण जेटली यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी चर्चा केली आहे. रिझर्व्ह बँकेचे विद्यमान डेप्युटी गव्हर्नर उर्जित पटेल आणि आंतरराष्ट्रीय नाणे निधीचे अर्थशास्त्रज्ञ सुबिर गोकर्ण या दोघांची नाव सध्या आघाडीवर आहेत.