आज चंद्र दिसणार सूर्यासारखा लाल!

Updated: Oct 8, 2014, 05:40 PM IST
आज चंद्र दिसणार सूर्यासारखा लाल! title=

नवी दिल्लीः आज चंद्रग्रहणामुळं आकाशात एक सुंदर दृश्य पाहयला मिळणार आहे. तेजस्वी प्रकाशासाठी ओळखला जाणार चंद्र हा संध्याकाळी पूर्णपणे सूर्यासारखा लाल रंग परिधान करणार आहे. सर्वसामान्यांसाठी खास करून शास्त्रज्ञांसाठी हे दृश्य मनोरंजक असून आज पूर्ण चंद्र ग्रहण दिसणार आहे.   

पुढील 20 वर्षापर्यंत तरी हे दृश्य पाहायला मिळणार नाही. अमेरिकेतील स्पेस एजन्सी नासाचे अनेक खगोल शास्त्रज्ञांनी पुन्हा नव्यानं चंद्राचा अभ्यास करण्याची तयारी केली आहे. 
 
भारतात चंद्र ग्रहणाची सुरुवात ही बुधवारी दुपारी 2.44 वाजतापासून ते संध्याकाळी 6 वाजून 4 मिनिट 7 सेकेंदापर्यंत असणार आहे. या वेळी सूर्य, पृथ्वी आणि चंद्र हे त्रिमूर्तीची भूमिका खगोलियन घटनाक्रमाप्रमाणे तीन तास 20 मिनिटे चालणार आहे.

चंद्रग्रहण सुरू असताना चंद्र हा पृथ्वीला 23 मिनिटांपर्यंत आच्छादित करणार आहे. हे सुंदर चंद्र ग्रहण पाहायचे असेल तर भारताच्या पूर्व भागामधील दिब्रुगर्ह, इम्फाल आणि कोहिमा या ठिकाणाहून दृश्य पाहण्यासारखे आहे. कारण इतर शहरांच्या तुलनेत इथे चंद्रोदय लवकर होतो.

8 ऑक्टोबरला या वर्षाचे दुसरे आणि शेवटचे पूर्ण चंद्रग्रहण लागणार आहे. या वर्षाचे पहिले पूर्ण चंद्र ग्रहण हे 15 एप्रिलला लागले होते. पूर्ण चंद्र ग्रहण कधी लागते. जेव्हा सूर्य आणि चंद्रच्यामध्ये पृथ्वी येते. तेव्हा या परिक्रमाच्या वेळी पृथ्वी पूर्णत: लपली जाते. त्यावर सूर्य प्रकाश पडत नाही. त्यामुळे चंद्र हा पृथ्वीपासून काही विशिष्ट जागेवरून दिसणं बंद होतं.

Broadcast live streaming video on Ustream

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.