पाहा काय वेळ आली आहे महात्मा गांधींच्या नातवावर

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे नातू कनूभाई गांधी आणि त्यांच्या पत्नी या दोघांनाही वृद्धाश्रमात राहण्याची वेळ आली आहे.

Updated: May 15, 2016, 10:21 PM IST
पाहा काय वेळ आली आहे महात्मा गांधींच्या नातवावर title=

नवी दिल्ली: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे नातू कनूभाई गांधी आणि त्यांच्या पत्नी या दोघांनाही वृद्धाश्रमात राहण्याची वेळ आली आहे. 87 वर्षीय कनूभाई गांधी आणि त्यांची पत्नी शिवालक्ष्मी गांधी दोघंही दिल्लीतल्या सरीता विहारमधील गुरुविश्राम वृद्धाश्रमात राहत आहेत. 

दोघांना मूल नाही आणि भावाबहिणींनीही दोघांकडे पाठ फिरवली. त्यामुळे हताश कनूभाई यांनी वृद्धाश्रमाची वाट धरली. 40 वर्षानंतर अमेरिकेहून परतल्यानंतर आधी गुजरात, मग दिल्ली आणि गेल्या दीड वर्षांपासून कनूभाई वृद्धाश्रमात राहत आहेत. 

आजही गांधींजींचे विचार त्यांच्यासाठी प्रेरणादायी आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ही माहिती मिळताच त्यांनी सांस्कृतिक मंत्री महेश शर्मा यांनी कनूभाई आणि त्यांच्या पत्नीच्या भेटीसाठी पाठवलं. यावेळी  शर्मा यांनी दोघांची भेट घेतली. या भेटीदरम्यान कनूभाई गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी फोनवरून संवादही साधला.