पत्त्यांच्या बंगल्यासारखी कोसळली इमारत

कानपूरमध्ये अचानक घराचं छत कोसळून अनेक महिला जखमी झाल्याची घटना घडली आहे.

Updated: May 15, 2016, 09:55 PM IST
पत्त्यांच्या बंगल्यासारखी कोसळली इमारत  title=

कानपूर: कानपूरमध्ये अचानक घराचं छत कोसळून अनेक महिला जखमी झाल्याची घटना घडली आहे. कानपूरच्या सिठमरा परिसरातही ही दुर्घटना आहे. या ठिकाणी एका लग्नाची वरात आली होती. ही वरात पाहण्यासाठी घराच्या छतावर 50 हून अधिक महिला जमल्या होत्या.

या छतावर इतक्या महिला जमल्या की त्यांच्या वजनामुळं या घराचं छत पत्त्याप्रमाणे खाली कोसळलं. यामुळे महिलाही खाली कोसळल्या. या दुर्घटनेत कोणतीही जीवीतहानी झाली नसली तरी अनेक महिला मात्र जखमी झाल्यात.

पाहा इमारत कोसळतानाचा व्हिडिओ