हिंदू संस्थेचं मध्यान्ह भोजन घ्यायला मदरशांचा नकार

मध्य प्रदेशच्या उज्जैनमधल्या तीस मदरशांनी हिंदू संस्थेकडून मिळणारं मध्यान्ह भोजन घ्यायला नकार दिल्याचा आरोप होत आहे.

Updated: Aug 6, 2016, 12:25 PM IST
हिंदू संस्थेचं मध्यान्ह भोजन घ्यायला मदरशांचा नकार  title=

उज्जैन : मध्य प्रदेशच्या उज्जैनमधल्या तीस मदरशांनी हिंदू संस्थेकडून मिळणारं मध्यान्ह भोजन घ्यायला नकार दिल्याचा आरोप होत आहे. इस्कॉन मंदिराच्या संस्थेला 2010 पासून या मदरशांना मध्यान्ह भोजन देण्याचं कंत्राट देण्यात आलं आहे. 

इस्कॉन मधून येत असलेल्या जेवणाचा आधी हिंदू देवांना नेवेद्य दाखवला जातो आणि मग आमच्या मुलांना ते जेवण दिलं जातं, त्यामुळे आमच्या मुलांना हे मध्यान्ह भोजन नको, असा आरोप पालकांनी केला आहे.

इस्कॉनमधून मध्यान्ह भोजन येणार असेल तर विद्यार्थ्यांना मदरशांमध्ये पाठवणार नाही, असा इशाराही पालकांनी दिला आहे. हिंदू संघटना असल्यामुळे मध्यान्ह भोजनाला विरोध होत असल्याचे आरोप मदरसा प्रशासनानं फेटाळून लावले आहेत. 

विद्यार्थ्यांना वेगळ्याप्रकारचं जेवण खायची सवय असल्यामुळे इस्कॉनचं मध्यान्ह भोजन घ्यायला नकार दिला असल्याचं मदरसा प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.