'एक्स्प्रेसवे'वर उतरली आठ लढाऊ विमान

आग्रा-लखनऊ एक्स्प्रेसवेचं उद्घाटन समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंग यांच्याहस्ते करण्यात आलं.

Updated: Nov 21, 2016, 05:34 PM IST
'एक्स्प्रेसवे'वर उतरली आठ लढाऊ विमान title=

उन्नाव : आग्रा-लखनऊ एक्स्प्रेसवेचं उद्घाटन समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंग यांच्याहस्ते करण्यात आलं. या उद्घाटनावेळी एक्स्प्रेसवेवर चार मिरेज 2000 आणि चार सुखोई अशी एकूण आठ लढाऊ विमानं उतरवण्यात आली. 

तब्बल 302 किमी लांब असलेला हा एक्स्प्रेसवे गरज पडली तर हवाईदलाच्या विमानांच्या उड्डाणासाठी आणि लॅडिंगसाठी वापरता येणार आहे. आग्र्यापासून सुरु होणारा हा एक्स्प्रेसवे फिरोजाबाद, मैनपुरी, इटावा, औरेया, कन्नोज, हरदोई, कानपूर आणि उन्नावमार्गे लखनऊला पोहोचणार आहे.

हा एक्स्प्रेसवे बांधण्यासाठी दहा जिल्ह्यातली 232 गावांमधली 3500 हेक्टर जमिन संपादित करण्यात आली. या एक्स्प्रेसवेमुळे लखनऊ ते आग्रा प्रवास साडे तीन तासांमध्ये तर दिल्ली ते लखनऊ प्रवास पाच ते सहा तासांमध्ये होणार आहे.

'एक्स्प्रेसवे'वर असं उतरलं विमान