शाही विवाहामुळे चर्चेत आलेल्या रेड्डींच्या कार्यालयावर छापे

मुलीच्या लग्नात बेसुमार खर्चामुळे वादात सापडलेले मायनिंग किंग आणि कर्नाटकचे माजी मंत्री जनार्दन रेड्डी यांच्या बेल्लारी येथील कार्यालयावर आयकर विभागाने छापे टाकले आहेत. आयकर विभागाचे अधिकारी कागदपत्र तपासत आहेत. जनार्दन रेड्डी यांच्या ओवुलापुरम मायनिंग कंपनीवर देखील छापे मारले गेले. त्यांच्या घरी देखील छापे टाकले जाऊ शकतात.

Updated: Nov 21, 2016, 04:49 PM IST
शाही विवाहामुळे चर्चेत आलेल्या रेड्डींच्या कार्यालयावर छापे title=

बेल्लारी : मुलीच्या लग्नात बेसुमार खर्चामुळे वादात सापडलेले मायनिंग किंग आणि कर्नाटकचे माजी मंत्री जनार्दन रेड्डी यांच्या बेल्लारी येथील कार्यालयावर आयकर विभागाने छापे टाकले आहेत. आयकर विभागाचे अधिकारी कागदपत्र तपासत आहेत. जनार्दन रेड्डी यांच्या ओवुलापुरम मायनिंग कंपनीवर देखील छापे मारले गेले. त्यांच्या घरी देखील छापे टाकले जाऊ शकतात.

१६ नोव्हेंबरला मुलीच्या शादी लग्नामुळे ते चर्चेत आले होते. लग्नाआधीच ते चर्चेत आले कारण अशी चर्चा होती की या लग्नात करोडो रुपये खर्च होणार आहेत. लग्नाच्या मंडपापासून ते पत्रिका, पाहुण्यांना जेवण्यासाठी चांदीची भांडी अशाक कारणांमुळे लग्न चर्चेत आलं. बॉलिवूडच्या काही आर्ट डायरेक्टर्सने या विवाहासाठी सेट तयार केले होते.

नोटबंदीनंतर भव्य लग्न सोहळा चर्चेत आला त्यानंतर आयकर विभागाची यावर नजर होती. त्यानंत आज कारवाई करण्यात आली.